राष्ट्रपती निवडणुकीचा आज निकाल
Updated On:

नवी दिल्ली -राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल उद्या (गुरूवार) जाहीर होणार आहे. त्या निवडणुकीसाठी 18 जुलैला 99 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. आता उद्या सकाळी 11 वाजता संसद भवनात मतमोजणीला प्रारंभ होईल. त्यानंतर सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैला समाप्त होणार आहे. त्यांचे उत्तराधिकारी ठरणाऱ्या 15 व्या राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैला होईल.





