Paris Olympics 2024 : माझ्यासाठी तुम्ही सर्व सुवर्णपदक विजेते आहात – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

President Droupadi Murmu meets Indian contingent for Paris Olympics : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे राष्ट्रपती भवनात स्वागत केले. यावेळी राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, “मी तुम्हा सर्वांचे येथे स्वागत करते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तुमच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी तुमचे अभिनंदन करते. माझ्यासाठी तुम्ही सर्व सुवर्णपदक विजेते आहात, आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे.”
त्याचवेळी भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि नेमबाज मनू भाकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले. यादरम्यान पीआर श्रीजेशने पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय हॉकी संघाचा प्रवास सांगितला. तो म्हणाला की, आमचा संघ चांगला खेळला, पण दुर्दैवाने आम्ही उपांत्य फेरीत हरलो.
याशिवाय कांस्यपदक जिंकणाऱ्या मनू भाकरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मनू भाकर म्हणाली की, टोकियो ऑलिम्पिकपासून इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. पण आमच्या टीमने खूप मेहनत घेतली.
President Droupadi Murmu met the Indian Contingent of the Paris Olympics 2024 at Ganatantra Mandap, Rashtrapati Bhavan. The President congratulated the players for their excellent efforts and great performance; and said that they are a source of inspiration for all the youth of… pic.twitter.com/iUequ3kd8y
— President of India (@rashtrapatibhvn) August 14, 2024
मनू भाकर हिने यावेळी पीटी उषा यांचे आभार मानले. पीटी उषा मॅडम यांच्यामुळेच आज मी पदक जिंकू शकलो, असे ती म्हणाली. याशिवाय संपूर्ण संघाची कामगिरी उत्कृष्ट होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आमचे अनेक खेळाडू चौथ्या स्थानावर राहिले आणि त्यांना पदक जिंकता आले नव्हते, परंतु यावेळी अनेक खेळाडूंनी आपल्या खेळात सुधारणा केली. यावेळी तिने पीटी उषा यांच्यासह भारतीय क्रीडा प्राधिकरणाचेही आभार मानले.






