प्रेमाची गोष्ट फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळेच्या कारचा मोठा अपघात; झोप लागली अन्…; व्हिडिओ पाहा

Swarda Thigale : स्टार प्रवाह या चॅनेलवरील प्रेमाची गोष्ट या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिच्या गाडीचा मोठा अपघात झाला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून स्वरदाने स्वतः तिच्यासोबत घडलेल्या अपघाताची माहिती शेअर केली आहे. अभिनेत्री स्वरदा ठिगळेने एक व्हिडिओ शेअर करून गाडीचा अपघात झाल्याची बातमी दिली आहे. शूटिंग आटपून परतत असताना तिच्या गाडीचा अपघात झाल्याचे तिने या व्हिडिओत सांगितले आहे.
अपघाताची संपूर्ण घटना तिने व्हिडिओत सांगितली असून, तिला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, तिच्या गाडीचे मोठं नुकसान झाले आहे. व्हिडिओत तिने आपल्या गाडीची झालेली वाईट अवस्था दाखवली आहे. स्वरदा ठिगळेने व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, तिच्या गाडीचा अपघात सकाळी 5.30 च्या सुमारास झाला. तिने सकाळी 7 वाजता काम सुरू केले होते. जे दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता संपले. त्यानंतर ती स्वतः गाडी चालवत होती. अचानक तिला झोप लागली आणि अपघात झाला. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले. गाडीची हेडलाइट फुटली. चाक खराब झालं. गाडीचं दार देखील उघडत नव्हतं, असे तिने व्हिडिओत सांगितले आहे. मात्र, सुदैवाने तिला अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही.
View this post on Instagram
अभिनेत्रीचे सहलाकारांना अवाहन
तिने या व्हिडीओतून सहकलाकारांना एक आवाहन केले आहे. चुकूनही असे न करण्याची विनंती तिने केली आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्टमध्ये अभिनेत्री स्वरदा ठिगळे मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेच्या कथेत अनेक ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. यामुळे प्रेक्षक उत्सुक आहेत.





