PBKS vs DC : ‘…तर ही गोष्ट असह्य आहे’, थर्ड अंपायरच्या निर्णयावर संतापली प्रीती झिंटा, पाहा VIDEO

PBKS vs DC Preity Zinta Slams Umpire’s Controversial Decision : पंजाब किंग्ज संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. आता त्याला टॉप २ मध्ये स्थान मिळवण्याची उत्तम संधी आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाला ६ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात पंचांनी एक खूपच वादग्रस्त निर्णय दिला. याबद्दल प्रत्येकजण प्रश्न उपस्थित करत आहे. दरम्यान, पंजाब संघाची मालकीण प्रीती झिंटा देखील पंचांच्या या चुकीवर संतापली आहे.
प्रीती झिंटा का संतापली?
पंजाब किंग्जला दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली ज्यामध्ये त्यांनी २० षटकांत ८ गडी गमावून २०६ धावा केल्या. त्यांच्या डावाच्या १५ व्या षटकात, शशांक किंग्जने मोहित शर्माच्या चेंडूवर लाँग ऑन मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि एका क्षणी हा चेंडू षटकारासाठी जाईल असे वाटत होते. त्याच वेळी, तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या करुण नायरने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याने तो अडवला पण लगेचच पंचाच्या दिशेने षटकार गेल्याचा इशारा केला. करुण नायरच्या मते तो षटकार होता. तरीही, हे प्रकरण तिसऱ्या पंचांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी तो षटकार म्हणून न स्वीकारता फक्त धाव दिली.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) May 24, 2025
इतकी तंत्रज्ञान असूनही, अशी चूक असह्य – प्रीती झिंटा
In a such a high profile tournament with so much technology at the Third Umpire’s disposal such mistakes are unacceptable & simply shouldn’t happen. I spoke To Karun after the game & he confirmed it was DEFINITELY a 6 ! I rest my case ! #PBKSvsDC #IPL2025 https://t.co/o35yCueuNP
— Preity G Zinta (@realpreityzinta) May 24, 2025
सामन्यानंतर प्रीती झिंटाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर संताप व्यक्त केला, ज्यामध्ये तिने लिहिले की, “आयपीएलसारख्या हाय प्रोफाइल स्पर्धेत जिथे इतके तंत्रज्ञान असताना, तरीही तिसऱ्या पंचांकडून अशी चूक होते, तर ही गोष्ट असह्य आहे. हे अजिबात घडू नये. सामना संपल्यानंतर मी करुण नायरशी बोलले आणि त्याने स्वतः पुष्टी केली की तो षटकार होता.” आता पंजाब किंग्जला लीग टप्प्यातील त्यांचा शेवटचा सामना २६ मे रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचा आहे.
हेही वाचा – PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स
सामन्याबद्दल बोलायचे तर, या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने कर्णधार श्रेयल अय्यरच्या ५३ आणि मार्कस स्टॉइनिसच्या ४४ धावांच्या जोरावर २०६ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात दिल्लीने कॅपिटल्सने करुण नायरच्या ४४ आणि समीर रिझवीच्या नाबाद ५८ धावांच्या जोरावर १९.३ षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केला.





