Pregnancy After age of 40: आई होणं ही प्रत्येक महिलेची इच्छा असते. परंतु वयाच्या ४० नंतर गर्भधारणा करणे थोडं अवघड आणि धोकादायक ठरू शकतं. नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (वय ४२) हिने आपली प्रेग्नन्सी जाहीर केली. या निमित्तानं पुन्हा एकदा ४० नंतरच्या प्रेग्नन्सीबद्दल चर्चा सुरू झाली आहे. ४० नंतरच्या प्रेग्नन्सीतील धोके स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते, ३५ वर्षांनंतर महिलांच्या अंड्यांची गुणवत्ता आणि संख्या कमी होऊ लागते. त्यामुळे गर्भधारणा होणं कठीण होतं. -गर्भपाताचा धोका वाढतो वाढतो. -थायरॉईड, डायबिटीज, उच्च रक्तदाब असल्यास गुंतागुंत वाढते. -नॉर्मल डिलिव्हरी अवघड होते; अनेकदा सिझेरियनचा धोका वाढतो. -बाळाला जेनेटिक आजार जसे टाईप-१ डायबिटीज किंवा डाउन सिंड्रोम होण्याची शक्यता अधिक असते. गर्भधारणा सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे? ४० नंतर आई होण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. 1. गर्भधारणा करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 2. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या. 3. मेंटल स्ट्रेस टाळा आणि वेळोवेळी तपासण्या करून घ्या. 4. गर्भधारणेनंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्या. तज्ज्ञ सांगतात की, ४० वर्षांनंतर गर्भधारणा करणे शक्य असलं तरी त्यात धोके असतात. त्यामुळे शक्य असल्यास आई होण्यासाठी जास्त चाळीशीच्या आधीच योजना करणं सुरक्षित ठरतं.