प्रीती झिंटाने साजरा केला आपल्या जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस ! सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो व्हायरल

मुंबई – अभिनेत्री प्रीती झिंटा बऱ्याच दिवसांपासून मोठ्या स्क्रिनपासून लांब आहे. असं असल तरी ती सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते आणि चाहत्यांना आपल्याबाबत ओपडेट देत असते. नुकतच प्रितीने आपल्या जुळ्या मुलांचा जन्म दिवस साजरा केला. यावेळेसचे काही फोटोज देखील तिने आपल्या इंस्टावर शेअर केले आहेत.
जिया आणि जय यांच्या पहिल्या वाढदिवसाच्या फोटोज प्रितीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी प्रितीने भावनिक पोस्ट लिहिली आहे. ज्यात ती म्हणते,मी माझ्या अभिनयाच्या करिअरमध्ये जितके रोल्स केले त्यातील एकही रोल यांची आई होण्याच्या जवळ देखील नाही. हॅप्पी बिर्थ डे मेरी जान असं म्हणत प्रितीने शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
मुलगी जियाला देखील यावेळी प्रितीने अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यात ती म्हणते,तुझ्या येण्यासाठी मी प्रार्थना केली होती. 2021 मध्ये, लग्नाच्या 5 वर्षानंतर, प्रीतीने सरोगसीद्वारे 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. ही माहिती प्रीतीने 18 नोव्हेंबर 2021 रोजी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे दिली होती. त्यांच्याच पहिल्या जन्म दिवसाचे फोटो शेअर करत प्रितीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.





