Preeti Sudan । केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये सुरू असलेल्या वादानंतर आयोगाने आज आयएएस अधिकारी प्रीती सुदान यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. प्रीती सुदान गुरुवारी म्हणजेच उद्या १ ऑगस्ट रोजी आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. कर्नाटक केडरच्या 1983 बॅचच्या IAS प्रीती सुदान यांचा कार्यकाळ एप्रिल 2025 पर्यंत असणार आहेत. प्रीती सुदान या कर्नाटक केडरच्या IAS अधिकारी Preeti Sudan । UPSC च्या नवनियुक्त अध्यक्षा प्रीती सुदान या कर्नाटक केडरच्या IAS अधिकारी आणि हरियाणाच्या रहिवासी आहेत. 1983 च्या बॅचचे IAS सुदान चार वर्षांपूर्वीच निवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक विभागात काम केले आहे. काही काळ त्यांनी केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयातही काम केले. याशिवाय त्यांनी संरक्षण मंत्रालयाचे सचिव म्हणूनही काम केले. अन्न व सार्वजनिक वितरण विभागातही त्यांची नियुक्ती झाली होती. प्रीती सुदान यांनी भारत सरकारचे आरोग्य सचिवपदही भूषवले होते. त्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर 2017 ते जुलै 2020 असा होता. कोविड-19 महामारीच्या काळात त्यांनी मुख्य रणनीतिकाराची भूमिका बजावली. महेश सोनी यांच्या राजीनाम्यानंतर नियुक्ती Preeti Sudan । “बेटी बचाओ, बेटी पढाओ “आणि “आयुष्मान भारत” मिशनचे नेतृत्व करण्याचे तसेच नॅशनल मेडिकल कमिशन, अलाईड हेल्थ प्रोफेशनल्स कमिशन आणि ई-सिगारेटवरील बंदीबाबत कायदे बनवण्याचे श्रेय त्यांना जाते. प्रीती सुदानने इंग्रजीमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. यानंतर त्यांनी अर्थशास्त्रात एमए, एमफिल आणि पीएचडी केली. यूपीएससीच्या प्रमुख बनणाऱ्या सुदान या दुसऱ्या महिला आहेत. प्रीती सुदानचे प्रमोशन UPSC चेअरमन महेश सोनी यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर झाले आहे, ज्यांनी अलीकडेच वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला होता. हेही वाचा राहुल गांधी, अनुराग ठाकूर अन् अखिलेश यांच्या वादात मायावतींचे मोठे विधान ; मोदी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी