Precautionary Blackout: : जैसलमेरात खबरदारीचा ब्लॅकआउट; भारत-पाकिस्तान तणावानंतर सतर्कता

Precautionary Blackout: भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी (१० मे) झालेल्या तात्पुरत्या युद्धविरामानंतर राजस्थानच्या जैसलमेर आणि बारमेर जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री खबरदारीचा ब्लॅकआउट लागू करण्यात आला. जैसलमेर जिल्हा प्रशासनाने रात्री ७:३० ते सकाळी ६:००, तर बारमेरमध्ये रात्री ८:०० ते सकाळी ६:०० पर्यंत हा ब्लॅकआउट जाहीर केला आहे. युद्धविरामानंतरही सीमेवर ड्रोन हल्ले आणि स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने प्रशासनाने ही पावले उचलली आहेत.
#WATCH | Rajasthan: Precautionary sirens amid complete blackout can be heard in Barmer.
(Visuals deferred by an unspecified time) pic.twitter.com/LIW3E1TbHo
— ANI (@ANI) May 11, 2025
शनिवारी रात्री युद्धविरामाच्या काही तासांतच जैसलमेर, श्रीनगर आणि जम्मूमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले, तर अनेक ठिकाणी ब्लॅकआउट लागू करण्यात आले. भारताने पाकिस्तानवर युद्धविरामाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे, तर पाकिस्ताननेही भारतावर असेच आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर जैसलमेरमध्ये शनिवारी एक मिसाईल सदृश वस्तू आढळली, जी भारतीय लष्कराने निष्क्रिय केली.
#WATCH | Rajasthan: A precautionary blackout has been enforced in Jaisalmer.
(Visuals deferred by an unspecified time) pic.twitter.com/iSXdCtwtWx
— ANI (@ANI) May 11, 2025
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ७ मे रोजी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला. अमेरिकेच्या मध्यस्थीने हा युद्धविराम झाला असला, तरी सीमेवरील परिस्थिती नाजूक आहे. जैसलमेर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घरातील आणि परिसरातील दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दल सतर्क असून, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.





