पिंपरी | प्रतिभा महाविद्यालयाच्या नियतकालिकास पुरस्कार

चिंचवड, (वार्ताहर) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे ‘विद्यार्थी विकास मंडळ’ हे दरवर्षी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांसाठी नियतकालिकांची स्पर्धा आयोजित करते.
सन 2022-2023 या वर्षीच्या अव्यावसायिक विभागातून पुणे शहर स्तरावरील ‘कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा वाणिज्य आणि संगणकशास्त्र महाविद्यालय चिंचवड’ या महाविद्यालयाच्या ‘दीप-प्रतिभा’ वार्षिक नियतकालिकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘संत ज्ञानेश्वर सहभागृहात विद्यापीठाचे रजिस्टार प्रा.डॉ. विजय खरे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य डॉ. सदानंद भोसले, डॉ. नितीन घोरपडे आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्रतिभा वाणिज्य आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज, कला व मानव्यविद्या शाखा प्रमुख डॉ. रूपा शहा,
महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालिका प्रा. ऋतुजा चव्हाण नियतकालिक दीप प्रतिभाच्या संपादिका प्रा.अमिता देशपांडे व सदस्य डॉ.दिनेश लाहोरी, डॉ. अनुराधा घोडके यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि धनादेश प्रदान करण्यात आला.
विद्यापीठास संलग्न 1000 पेक्षा अधिक महाविद्यालये नियतकालिका स्पर्धेत सहभागी होतात. या कार्यक्रमास 700 हून अधिक पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर आणि नाशिक इत्यादी जिल्ह्यातील व्यावसायिक आणि अव्यावसायिक महाविद्यालयाचे संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
‘दीप-प्रतिभा’ नियतकालिकास प्रतिभा ग्रुपचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांचे मार्गदर्शन लाभले. नियतकलिकासाठी मराठी विभाग प्रा. अमिता देशपांडे, हिंदी विभाग प्रा. डॉ. रवींद्र निरगुडे, इंग्रजी विभाग प्रा. मधुरा वाघ, फोटो विभाग प्रा. चंद्रकांत सोनवणे व प्रा.दिनेश सोनवणे, डॉ. दिनेश लाहोरी, प्रा. वैशाली साठे, प्रा. श्रद्धा भिलारे, प्रा. अपराजिता कडवेकर, प्रा. अमोला जेऊरे यांनी प्रा. डॉ. अनुराधा घोडके, मधुकर शिंदे यांनी सहकार्य केले.





