‘कधीही न विसरता येणारा दिवस…’, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने प्रथमेश परबने शेअर केले खास फोटो

Prathamesh Parab | अभिनेता प्रथमेश परबने बालक-पालक, टाईमपास, टाईमपास 2, लालबागची राणी, उर्फी या चित्रपटांमधून मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटांच्या माध्यमातून प्रथमेश महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. प्रथमेशने गेल्यावर्षी क्षितिजा घोसाळकरशी लग्न केले. दोघांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने प्रथमेशने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
प्रथमेश आणि क्षितिजाने 24 फेब्रुवारी 2024 ला लग्न केले होते. थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. दोघांच्याही लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाली असून, यानिमित्ताने दोघे परदेशात फिरायला गेले आहेत.
View this post on Instagram
प्रथमेश आणि क्षितिजा दोघेजण सध्या थायलंडमध्ये आहे. दोघांनी थायलंड ट्रिपमध्ये त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. लग्नानंतर पहिल्यांदाच दोघे आंतरराष्ट्रीय ट्रिपला गेले आहेत. या ट्रिपचे काही खास फोटोही प्रथमेशने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
दोघांचे थायलंड ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रथमेशने मजेशीर कॅप्शनसह हे फोटो शेअर केले आहेत. याशिवाय, लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानेही त्याने काही फोटो शेअर केले. ‘24.02.2024 आतुरतेने वाट पाहिलेला आणि कधीही न विसरता येणार दिवस.’, अशा कॅप्शनसह त्याने लग्नातील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकार लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.





