प्रथमेश परब आणि क्षितिजाचा साखरपुडा संपन्न; ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी नवी सुरुवात

Prathamesh Parab : ‘टाईमपास’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता प्रथमेश परबचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याने क्षितिजा घोसाळकरसोबत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने ही माहिती चाहत्यांंना दिली आहे.
‘आमचा व्हॅलेंटाईन डे’ असं म्हणत प्रथमेशने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी या जोडीला भरभरुन शुभेच्छा दिल्या. साखरपुड्यासाठी प्रथमेशने खास सूट परिधान केला होता. तर क्षितीजाने जांभळ्या रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. गुडघ्यावर बसत फिल्मी स्टाइलमध्ये प्रथमेशने क्षितीजाच्या हातात अंगठी घातली. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
मागील काही दिवसांपूर्वीच व्हॅलेंटाईन डेच्या खास दिवशी साखरपुडा करणार असल्याची माहिती क्षितीजाने दिली होती. सोशल मीडियाद्वारे काही दिवसांपूर्वीच त्याने गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत नात्याची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर त्यांनी आता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 24 फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
दरम्यान, मोहसीन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ हा प्रथमेशचा सिनेमा येत्या 9 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात प्रथमेशसोबत पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे-पाटील हे कलाकार आहेत. या सिनेमाची निर्मिती डेव्हिड नादर यांनी केली आहे.





