एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईकांची नियुक्ती; निवड होताच अजित पवारांवर केली नाराजी व्यक्त?

मुंबई : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसटी महामंडाळाच्या अध्यक्षपदी अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. होती.
त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी नाराजीच्या चर्चेला पुर्णविराम देत एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतला होता. त्यांनतर आता एसटी महामंडळावर अधिकृतपणे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर माध्यामांशी संवाद साधताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार प्रताप सरनाईक यांनी आभार मानले. तसेच अजित पवारांच्या अर्थखात्यावर नाराजी देखील व्यक्त केली. Ajit Pawar |
अर्थखात्याकडून पैसे वेळत मिळत नाहीत : मंत्री सरनाईक
एसटीची प्रवासी संख्या वाढली आहे. परंतू अर्धे तिकीटाचे पैसे जे आहेत ते आम्हाला शासनाकडून प्रतिपूर्तीच्या माध्यमातून मिळत असतात ते जर वेळेवर मिळाले, तर आम्ही नफ्यात जाऊ. पण कधी कधी ते अर्थखात्याकडून पैसे वेळत मिळत नाहीत. त्यामुळं अनेक समस्या निर्माण होतात, असं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. Pratap Sarnaik |
एकनाथ शिंदेसह अनेकांनी भूषवले अध्यक्षपद
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी महामंडळ) स्थापना 1960 मध्ये करण्यात आली. मंत्री प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे 26 वे अध्यक्ष असणारं आहेत. र.गो.सरैय्या हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर 2014 ते 2019 मध्ये दिवाकर रावते हे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते.
त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल परब यांच्याकडे मंत्रिपदची आणि अध्यक्षपदाची जबाबदारी होती. हीच परंपरा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना कायम ठेवण्यात आली. त्यावेळी एकनाथ शिंदे हेच राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते. मात्र, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परंपरेला ब्रेक दिला होता. त्यानंतर पुन्हा प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Pratap Sarnaik |





