Prashant Koratkar । इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दणका देत आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकिलांची पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने या मागणीवर निर्णय देत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात प्रशांत कोरटकरला हजर करण्यात आले होते. अटक केल्यानंतर न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज पूर्ण होत असून आज कोरटकरला मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोर्टासमोर हजर करण्यात आले. तर न्यायधीश एस एस तट यांच्या समोर सुनावणीला सुरुवात झाली असून सरकारी पक्षातर्फे वकील सूर्यकांत पोवार, इंद्रजीत सावंत यांच्या तर्फे अँड.असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले. तर प्रशांत कोरटकर यांच्या तर्फे सौरभ घाग हे प्रत्यक्ष वकील म्हणून उपस्थित होते. ॲड. सौरभ घाग – ॲड. असीम सरोदे यांच्यात शाब्दिक चकमक Prashant Koratkar । अशातच, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात ॲड. सौरभ घाग आणि ॲड. असीम सरोदे यांच्यात कोर्टासमोर तू-तू, मैं-मैं झाल्याचे बघायला मिळाले आहे. तर दोघांनी एकमेकांना शांत बसा, असा दम भरला आहे. पोलीस चौकशीत कोरटकरने काही नाव घेतली आहेत. त्यात खरंच त्यांचा सहभाग आहे का? याची चौकशी करण्याची आहे. असा गंभीर गुन्हा असताना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा, धीरज चौधरी याने मदत केल्याचं यात सांगितलं जातंय. काही हॉटेलमध्ये थांबलो होतो हे देखील कोरटकर याने सांगितलं आहे. यावेळी कोणतीही ऑनलाईन पैसे दिले नाहीत, त्यामुळे याला कुणी मदत केली हे पहावं लागेल. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे. अशी बाजू सरकारी पक्षातर्फे वकील सूर्यकांत पोवार यांनी मंडळी आहे. आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी Prashant Koratkar । दोन समाजात तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य प्रशांत कोरटकर ने केलं आहे. या आरोपीला कोणत्या संघटनेने किंवा व्यक्तीने मदत केली आहे का? हा तपास करावा लागणार आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हेतू आरोपीचा होता. फोन केलेला आवाज त्याचाच होता, हे सिद्ध होतंय. त्याला समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कोण मदत करत आहे का? याचा तपास करावा लागणार आहे. पोलिसांच्या तपासात यश मिळत आहे. त्यामुळे पोलिसांच्या हक्कानुसार आणखी पोलीस कोठडी मिळावी अशी बाजू सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी मांडली. तपासादरम्यान त्याची कोठडीमध्ये पोलिसांकडून गेली तर अडचणी निर्माण होईल. कारण यामध्ये खोलात जाऊन तपास करायचा आहे. जर पोलीस कोठडी मिळाली नाही तर ज्यांना समाजात तेढ निर्माण करण्याचा हेतू होता ते यशस्वी होईल. कोरटकरने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी एक गाडी जप्त केलीय. पण तो इंदोर, हैदराबाद, चंद्रपूर इथं गेला आहे. त्यामुळे आणखी गाड्या वापरल्याची शक्यता आहे. त्याचा तपास करावा लागणार आहे, त्यामुळे पोलीस कोठडी मिळावी ही विनंती सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी कोर्टाला केली आहे. हेही वाचा नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडेच राहणार? ; रायगडचा निर्णय शिंदे-पवार घेण्याची शक्यता