‘भाजपला 370 जागा मिळाल्या नाहीत तर…’ ; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

Prashant Kishore on BJP । निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मोठे भाष्य केले आहे. प्रशांत किशोर यांनी “केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात कोणताही महत्त्वपूर्ण असंतोष किंवा मजबूत पर्याय नाही.” असे म्हटले आहे. तसेच “मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे.” असा दावा केला आहे.
तिसऱ्यांदा भाजप सत्तेत येणार Prashant Kishore on BJP ।
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी हा दावा केला आहे. त्यांनी या मुलाखतीत, “मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप पुन्हा सत्तेत येत आहे. त्यांना मागील वेळेपेक्षा समान किंवा किंचित जास्त जागा मिळू शकतात. भाजपचे 370 जागांचे लक्ष्य या प्रश्नावर प्रशांत किशोर म्हणाले, जर भाजपने 275 जागा जिंकल्या तर त्यांचे नेते सरकार स्थापन करणार नाही असे म्हणणार नाहीत, कारण त्यांनी 370 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. भाजप बहुमताचा आकडा पार करतो की नाही हे पाहावे लागेल. पण भाजपच्या सत्तेत परत येण्यात काही धोका आहे असे मला वाटत नाही.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
‘भाजपला 370 जागा मिळाल्या नाहीत तर…’Prashant Kishore on BJP ।
इतकंच नाही तर प्रशांत किशोर यांनी भाजपचा ३७० जागांच्या दाव्याला चालढकल असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, यामुळे निवडणुकीची चर्चा बदलली. “जेव्हा एखाद्या कंपनीकडून अपेक्षा खूप जास्त असतात आणि चांगली कामगिरी करूनही ती ती पूर्ण करत नाही, तेव्हा त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येतो. त्याचप्रमाणे भाजपला 370 पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर तो विषय होऊ शकतो. चर्चा आणि त्याचा परिणाम बाजारावरही दिसून येतो.” असे म्हणत त्यांनी या सगळ्या चर्चा असल्याचे म्हटले आहे.
पुढे त्यांनी “गेल्या 3-4 महिन्यांत 370 आणि 400 च्या पुढे चर्चा सुरू आहे. ही भाजपची रणनीती किंवा विरोधकांचा कमकुवतपणा समजा पण भाजपने आपले लक्ष्य 272 वरून 370 पर्यंत हलवले आहे. याचा फायदा भाजपला झाला. आता कोणी म्हणत नाही की मोदीजी हरतील, प्रत्येकजण म्हणत आहे की त्यांना 370 जागा मिळतील की नाही.” असेही त्यांनी म्हटले.





