“तो देशभक्त, त्याचा हेतू चुकीचा नव्हता” ; कुणाल कामराच्या समर्थनार्थ प्रशांत किशोर सरसावले

Prashant Kishor on Kunal Kamra । जन सूरज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आता विनोदी कलाकार कुणाल कामराच्या समर्थनार्थ सरसावले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त व्हिडिओ बनवून चर्चेत आलेल्या कुणाल कामरा यांच्याबद्दल प्रशांत किशोर यांनी एक विधान केले आहे. प्रशांत किशोर यांनी, “कुणाल माझा मित्र आहे. तो देशावर प्रेम करणारा माणूस आहे, त्याची शब्द निवड चुकीची असू शकते पण त्याचे हेतू चुकीचे नव्हते.” असे म्हणत कुणाल कामराच्या कृतीचे समर्थन त्यांनी केले आहे.
अमित शहांच्या भेटीबद्दल पीके काय म्हणाले? Prashant Kishor on Kunal Kamra ।
अमित शहांच्या बिहार दौऱ्यावर टीका करताना प्रशांत किशोर यांनी, “आतापासून निवडणुकीपर्यंत मोदी आणि अमित शहा फक्त बिहार पाहतील. बिहारच्या विकासासाठी केंद्र सरकारने काय केले आहे हे त्यांनी सांगावे. त्याच वेळी, प्रशांत किशोर यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर रस्त्यावर नमाज अदा केल्याबद्दल हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये फरक आहे. योगींचे संपूर्ण राजकारण हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणावर आधारित आहे, आम्हाला बिहारचे उत्तर प्रदेश होऊ नये अशी इच्छा आहे.” असे त्यांनी म्हटले. दरम्यान, बिहारमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. जनसुराज यावर्षीही निवडणूक लढवणार आहेत.
त्याच वेळी, स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने म्हटले आहे की, अलीकडील वादानंतर त्याच्या जीवाला धोका आहे. याविषयी कुणाल कामरा यांनी, “मी विल्लुपुरम (तामिळनाडू) चा रहिवासी आहे. जर मी मुंबईत परत आलो तर मला मुंबई पोलिस अटक करतील, माझ्या जीवाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपासून धोका आहे.” असे म्हटले आहे. कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयातून ट्रान्झिट अॅन्टिसिपेटरी जामीन मागितला आहे. न्यायालयाने दुपारी याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केले आहे.
जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण Prashant Kishor on Kunal Kamra ।
कुणाल कामराने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्याने ‘दिल तो पागल है’ या बॉलिवूड चित्रपटातील गाण्यावर एक विडंबन केले. या गाण्याद्वारे त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र टीका केली. शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांना या टिप्पण्या आवडल्या नाहीत.





