‘चांगले कार्य करताना काळे कपडे घालत नाही’ नेटकऱ्याच्या कमेंटला प्रशांत दामलेंनी दिले मजेशीर उत्तर

Updated On:

मुंबई – अभिनेता प्रशांत दामले (Prashant Damle)यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेक नाटक, चित्रपट मालिकांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. त्यांच्या आगामी प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. याशिवाय ते सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. विजयादशमीनिमित्त प्रशांत दामले यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. यावर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटला प्रशांत दामले यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांच्या या उत्तराची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

दसऱ्यानिमित्त प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. यामध्ये ते नाटकाच्या बसची पूजा करताना दिसत आहेत. हे करत असताना त्यांनी काळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्सची पॅन्ट परिधान केली होती. परंतु सणाच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे एका नेटकऱ्याला आवडले नाही. यावरून त्या चाहत्याने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “दामले दादा, चांगले कार्य करताना काळे कपडे नसतात परिधान करायचे.” मात्र प्रशांत दामले यांनी ही शांत न बसता यावर प्रत्युत्तर दिले.

प्रशांत दामले यांनी नेटकऱ्याच्या कमेंटला रिप्लाय करत ‘उघडा कसा येणार?’असे म्हंटले. प्रशांत दामले यांची ही कमेंट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’  आणि ‘नियम व अटी लागू’ नाटकांंना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे प्रयोग देशासह परदेशातही गाजत आहेत. या नाटकाचे लेखन संकर्षण आणि दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. तर या नाटकाचे निर्मिते प्रशांत दामले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

K. T. Rama Rao : ‘स्टारलिंक’ रोखणाऱ्यांची नावे जाहीर करा; मस्क यांच्या आरोपांनंतर के. टी. रामाराव यांची मागणी

2026-10-08 16:18:58

K. T. Rama Rao : ‘स्टारलिंक’ रोखणाऱ्यांची नावे जाहीर करा; मस्क यांच्या आरोपांनंतर के. टी. रामाराव यांची मागणी

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Kiara and Sidharth Malhotra : कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा; फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'

2026-10-07 12:00:00

Kiara and Sidharth Malhotra : कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा; फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'

Jaya Bachchan : जया बच्चन यांनी आंदोलनादरम्यान थेट पत्रकाराचा माइकचं ढकलला; कंगणा यांनी साधला निशाणा

2026-10-07 09:35:12

Jaya Bachchan : जया बच्चन यांनी आंदोलनादरम्यान थेट पत्रकाराचा माइकचं ढकलला; कंगणा यांनी  साधला निशाणा

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा

2026-10-06 16:57:55

Jahnavi Killekar : जान्हवी किल्लेकरचा थरारक अंदाज.! खुनाच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी 27 नोव्हेंबरला येणार खास सिनेमा