प्रार्थना बेहेरे वडिलांच्या आठवणीत भावुक; व्हिडिओ शेअर करत म्हणाली “आता बाबा नाही, पण…”

Prarthana Behere | अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने वडिलांच्या आठवणीत एक व्हिडीओ शेअर केला आहे. 14 ऑक्टोबर 2025 रोजी एका रस्ते अपघातात प्रार्थनाच्या वडिलांचे निधन झाले होते, तेव्हा तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या होत्या. आता प्रार्थनाने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती वडिलांची आठवण सांगत एक खास माहिती देते. यावेळी तिला अश्रु अनावर होतात.
“आज हा व्हिडीओ करण्यामागचं कारण म्हणजे आज 14 तारीख आहे. माझ्या बाबांना जाऊन दोन महिने झाले. मला खरंतर सुचत नाहीये, कारण मी कधीच तुमच्यासमोर मोकळेपणे व्यक्त झाले नाही. मला कसं वाटतंय, हे तुम्हा सर्वांना समजलंय. तुमचे मेसेज मी वाचले. पण ते दु:ख आहे आणि ते कायम राहील. ते मी सांगू शकत नाही. पण माझे बाबा नेहमी मला म्हणायचे की आयुष्यात नेहमी खुश राहा. आनंदी राहायचा प्रयत्न कर. तू एक अभिनेत्री आहेस, सर्वांचं मनोरंजन करण्याचं तुझं काम आहे. तूझं काम चोख कर, छान कर. ते असताना मी जे काम केलं होतं, ते नसताना आता बाहेर येणार आहे,” असे प्रार्थना म्हणते. Prarthana Behere |
View this post on Instagram
“बाबांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे, पण मला तुमचाही आशीर्वाद हवा आहे. बाबा मला नेहमी म्हणायचे की मी तुझा खूप मोठा फॅन आहे. आता बाबा नाही, पण मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात. उद्या काहीतरी स्पेशल घेऊन येतेय, जे खरंतर माझ्या बाबांसाठी आहे, तुमच्या सर्वांसाठी आहे. त्यासाठी मला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हवे आहेत. माझं हे काम बाबा असताना त्यांनी बघितलं होतं. आता उद्या ते तुमच्यासमोर येईल,” अशा शब्दांत प्रार्थना आपल्या भावना व्यक्त करते. सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी प्रार्थना तिच्या नव्या प्रोजेक्टची माहिती देणार आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा:
साधे कपडे, डोक्यावर टोपी आणि पायात स्लीपर…; कॉमेडियन सुनील पालचा व्हिडिओ पाहून चाहते हैराण





