Praneet Vaibhav Video : ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’वरून गुन्हा दाखल झालेला प्रणीत मोरे पुन्हा चर्चेत! वैभव सूर्यवंशीसोबतचा ‘तो’ VIDEO व्हायरल
Praneet Vaibhav Video : आता प्रणीत मोरेचा भारताचा १५ वर्षीय युवा स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याच्यासोबतचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Praneet More Viral Video Vaibhav Sooryavanshi : ‘३७० रुपयांची चिकन बिर्याणी’ आणि अश्लील वक्तव्यांमुळे सर्व स्तरातून प्रचंड टीका होत असलेला स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाने आक्षेपार्ह व अश्लील आशय प्रसारित केल्याप्रकरणी प्रणीत मोरे, हिमांशू जांगरा, डॉ. सेजल पवार आणि इतरांविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला आहे. या कायदेशीर कारवाईच्या आणि वादाच्या पार्श्वभूमीवर आता प्रणीत मोरेचा भारताचा १५ वर्षीय युवा स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याच्यासोबतचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटिझन्स त्याचे बारकाईने निरीक्षण करत आहेत.
“एक बिहारी सर्वांवर भारी…”; वैभव सूर्यवंशी झाला ओशाळा!
हा व्हिडिओ प्रणीतच्या एका जुन्या शोमधील आहे, जिथे वैभव सूर्यवंशी पाहुणा म्हणून उपस्थित राहिला होता. प्रणीतने शोमध्ये सांगितले की, वैभव त्याला सोशल मीडियावर फॉलो करतो आणि वर्ल्ड कप फायनलपूर्वी वैभवने स्वतः मेसेज करून या शोमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. प्रणीतने त्याच्या खास शैलीत वैभवला म्हटले, “अरे तू तर पाकिस्तानी क्रिकेटर्सचा मैदानावर क्लास घेतोस, आता इथे माझा क्लास घेऊ नकोस!” यानंतर प्रणीतने वैभवच्या अंडर-१९ मधील दमदार कामगिरीचे कौतुक करत, “एक बिहारी सर्वांवर भारी” अशी टिप्पणी करताच ऑडिटोरियममध्ये एकच हास्यकल्लोळ उठला आणि वैभव सूर्यवंशी काहीसा ओशाळताना दिसला.
कॉम्प्लानवरून बाबर आझमला लगावला जबरी टोला!
Vaibhav Suryavanshi to Pranit More before the show: ‘Bhaiya, I’ll come on your show, just don’t take my class!’ 👀
Luckily, an RR manager stayed with him the entire time. Safe to say, Suryavanshi is in good hands.pic.twitter.com/QtE1PMHGda
— Cricket Central (@CricketCentrl) June 11, 2026
वैभव सूर्यवंशीच्या ‘कॉम्प्लान’ ब्रँडच्या जाहिरातीचा संदर्भ देत प्रणीतने पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमची चांगलीच खिल्ली उडवली. प्रणीत म्हणाला, “आता देशातील तरुण खेळाडूंना वाटेल की चांगली बॅटिंग करण्यासाठी कॉम्प्लान पिणे गरजेचे आहे. पण कॉम्प्लान पिल्याने बाबर आझमची हाईट (उंची) तर वाढली, पण त्याचा स्ट्राईक रेट मात्र वाढू शकला नाही.” त्याच्या या पंचलाईनवर प्रेक्षकांनी मोठा जल्लोष केला होता.
नेमका काय आहे प्रणीत मोरेचा ‘३७० बिर्याणी’ वाद?
प्रणीत मोरेच्या एका शोमध्ये, डेटवर गेलेल्या एका तरुणाने मुलीसाठी ३७० रुपयांची चिकन बिर्याणी विकत घेतल्याचे सांगितले. त्यावर प्रणीतने त्या खर्चाच्या बदल्यात मुलीकडून काहीतरी अश्लील गोष्ट ‘वसूल’ करण्यासारखी अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावर वाद वाढल्यानंतर त्याने जाहीर माफीही मागितली. याच शोमध्ये डॉ. सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मृत पुरुषांच्या शरीराबाबत अत्यंत अवमानकारक वक्तव्य केले होते, ज्यामुळे या सर्वांवर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.





