“अर्थ मंत्र्यांनी केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आणि खोट बोलण्यात धन्यता मानली”

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता संसदेत आर्थिक वर्ष 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीपूर्वी सादर होणारा मोदी सरकारच्या चालू कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सुमारे तासभर भाषण केले. अर्थसंकल्पाकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. अर्थसंकल्पाबाबत देशभरातील नेत्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या अर्थसंकल्पाबाबत सवाल उपस्थित करत भारत सोडून जाणाऱ्या उद्योजकांची आकडेवारीच समोर आणली आहे.
“हे सरकार केवळ ज्ञान देताय पण, भारतीय युवा,गरीब,महिला आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.अर्थ मंत्र्यांनी केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आणि खोट बोलण्यात धन्यता मानली” अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आपल्या अधिकृत एक्सवरून पोस्ट करत आंबेडकर यांनी अर्थसंकल्पाबाबत आपले म्हणणे मांडले आहे.
“अर्थमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे आपली अर्थव्यवस्थ उत्तम असेल तर गेल्या नऊ वर्षांमध्ये तब्बल १२,८८,२९३ उद्योजकांनी भारत का सोडला ? ७,२५,००० भारतीयांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला ? यापैकी बहुसंख लोक हे ‘व्हायब्रंट गुजरात’शी संबंधित होते. वास्तविक सरासरी उत्पन्नात ५० % वाढ झाली या माहितीचा स्रोत काय ? PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आणि दिलेली माहिती शंकास्पद आहे.अंतरिम बजेटमध्ये केवळ ज्ञान वाटण्यात आले आहे. असं देखील आंबेडकर यांनी यावेळी पोस्टमध्ये म्हंटले म्हणाले.
आजच्या अंतरिम अर्थसंकल्पातुन सरकारने केवळ ज्ञान वाटण्यात धन्यता मानली आहे.
: @Prksh_Ambedkar pic.twitter.com/jKnYcIK7L7
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) February 1, 2024
CM शिंदे म्हणतात..
गेल्या ६० वर्षांत जे निर्णय झाले नाहीत, ते गेल्या १० वर्षांत झाले. गरीब, शेतकरी, महिला व तरुण या चार प्रमुख घटकांना त्यांनी न्याय दिला. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करावं, हे त्यांनी दाखवून दिलं. आजच्या अर्थसंकल्पात महिला व मुलींना प्राधान्य दिलं आहे. पंतप्रधान आवास योजनेत २ कोटी घरं वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक प्रकारे रोटी, कपडा, मकान देणारा हा अर्थसंकल्प व हे केंद्र सरकार आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.यांनी दिली.





