प्रकाश आंबेडकर आज ४ वाजता करणार ‘मोठी घोषणा’

Prakash Ambedkar | वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आज एक मोठी घोषणा करणार आहे. वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियावर व्हिडीओही शेअर केला आहे. लवकरच विधानसभा निडणूक होणार आहे. अशात सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशात आता विधान सभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर वंचित कडून नेमकी काय घोषणा केली जाणार यावर चर्चां रंगली आहे.
I will be making a BIG announcement today.
Press Conference at Subedari Government Guest House in Aurangabad.
See you at 4 PM. https://t.co/a9I8zXYPnH
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) July 16, 2024
नेमकं काय आहे ट्विट
वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ट्विटरवरुन एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. या व्हिडीओत आज संध्याकाळी 4 वाजता एक मोठी घोषणा होणार असल्याचे म्हटले आहे. यानिमित्ताने औरंगाबादमध्ये एका पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे, असे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यासोबतच प्रकाश आंबेडकरांचा सभेतील एक व्हिडीओ आणि पक्षाचे चिन्हदेखील या व्हिडीओत दिसत आहे.
दरम्यान, ‘आज मी मोठी घोषणा करणार आहे. यासाठी औरंगाबादमधील सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर दुपारी 4 पत्रकार परिषद घेणार आहे”, अशी माहिती आंबेडकर यांनी ट्विट करुन दिली.
या ट्विटवरून राजकीय चर्चाना उधाण आले आहे. त्यांच्या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. वंचीतकडून नेमकी काय घोषणा असेल का? त्यांच्या घोषणेमुळे राजकीय समीकरण बदलणार असल्याची चर्चा आहे. प्रकाश आंबेडकरांच्या घोषणेनंतर आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर काय घोषणा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





