Prajakta Mali: ‘लग्न कधी करणार?’ चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीने दिलं सडेतोड उत्तर
Prajakta Mali : 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून प्राजक्ता माळी घराघरात पोहोचली होती. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करत आहे.

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) मराठी मालिका, चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.
एका चाहत्याने प्राजक्ताला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला. “नॅशनल प्रश्न…लग्न कधी करणार?” असा प्रश्न चाहत्याने प्राजक्ताला विचारला. खाजगी प्रश्न विचारणाऱ्या चाहत्याला प्राजक्ताने जशास तसं उत्तर दिलं. Prajakta Mali
“हा माझ्या आई-वडिलांचा प्रश्न आहे…तुझा नाही”, असं प्राजक्ता चाहत्याला म्हणाली. ३६ वर्षीय प्राजक्ता अजूनही अविवाहित आहे. यावरून तिला अनेकदा सवाल केला जातो. यावर आता तिने पुन्हा एकदा ठामपणे उत्तर दिले आहे. Prajakta Mali
प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘चं सूत्रसंचालन करत आहे. अलिकडेच ती ‘देवखेळ’ वेब सीरिजमध्ये ती दिसली होती. प्राजक्ता अभिनेत्री असण्यासोबतच एक बिजनेस वुमनही आहे. तिचा स्वत:चा दागिन्यांचा ब्रँड आणि निर्मिती संस्था आहे. Prajakta Mali
हेही वाचा:






