प्राजक्ता माळीने सिंगापूरमधून केली मोठी घोषणा; म्हणाली…

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’या रिॲलिटी शोद्वारे ती घराघरात पोहचली आहे. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अभिनेत्रीसह प्राजक्ता बिझनेस वुमन सुद्धा आहे. मागील वर्षी तिने ‘प्राजक्ताराज’ नावाचा ज्वेलरी ब्रँड लॉंच केला होता. त्यानंतर आता तिने सिंगापूरहून इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
प्राजक्ता इन्स्टा लाईव्हवर म्हणते, “नमस्कार मंडळी, आज आपण ‘प्राजक्तराज पारंपारिक मराठी साज’मध्ये नवा दागिना लाँच करणार आहोत. आज मला खूप आनंद होत आहे कारण मी हा दागिना सिंगापूरमधून लाँच करीत आहोत. आज आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये आलो आहोत. युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये सर्वच मंडळी एन्जॉय करीत आहेत.”
View this post on Instagram
पुढे ती म्हणते, “तुम्हा सर्वांचे या लाईव्हमध्ये स्वागत आहे. आज कोणता दागिने लाँच होणार हा प्रश्न तुम्हाला मी विचारून देणार नाही. कारण तो दागिनाच मी परिधान केलेला आहे. अनेक देवदेवतांनीही हा साज परिधान केलेला आहे. आजच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण ‘मोकळ्या घसाची वज्रटीक’ लाँच करीत आहोत,” असं म्हणत अभिनेत्रीने या दागिन्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये प्राजक्ताने या दागिन्याचे वैशिष्ट्य देखील प्रेक्षकांना सांगितले. प्राजक्ताच्या व्हिडिओवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.





