‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मध्ये पिंकू, गोपी आणि गोली यांना सोधी कडून त्यांच्या नाटकाच्या सादरीकरणाबद्दल खूप कौतुक मिळते. त्यांचे नाटक खूपच मनोरंजक होतं आणि माहितीपूर्ण होतं असं मेहता त्यांना सांगतो. फोनमुळे एका पेशंटला डिप्रेशन आल्याचं डॉक्टर हाथी सांगतो. सगळेजण या नाटकाबद्दल खूप गप्पा मारतात आणि मुंबईतल्या स्ट्रगलबद्दल चर्चा करतात. आता भिडे, माधुरी आणि नटुकाका यांचे नाटक होणार आहे. “मुजरिम भिडे हाजीर हूं’ असं त्यांच्या नाटकाचे नाव आहे.