Prague University Shooting : प्रागच्या विद्यापीठात बेधुंद गोळीबार ; 15 जण ठार तर 20 हून अधिक जखमी

Prague University Shooting : चेक रिपब्लिकची राजधानी प्राग येथील एका विद्यापीठात बेधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात 15 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 20 जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ज्याने गोळीबार केला तो ठार झाल्याचे चेक पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी अद्याप हल्लेखोराच्या ओळखीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. ठार झालेल्या गोळीबाराचाही मृतांमध्ये समावेश आहे.
चेक पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना, “हल्ला करणाऱ्या शूटरला पोलिसांनी ठार केले आहे. सध्या संपूर्ण इमारत रिकामी केली जात आहे. या हल्ल्यात अनेक लोक मारले गेले आहेत, तर डझनभर जण जखमी झाले आहेत.तपास सुरू आहे.”
सीएनएनच्या रिपोर्टनुसार, प्रागच्या ओल्ड टाऊनजवळ असलेल्या चार्ल्स युनिव्हर्सिटीच्या आर्ट्स फॅकल्टीमध्ये गोळीबार झाला. चेकचे पोलिस प्रमुख मार्टिन वोंड्रासेक यांनी सांगितले की, गोळीबार करणारा 24 वर्षांचा याच विद्यापीठातील कला शाखेचा तो विद्यार्थी होता. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिस पथक या हल्ल्यामागील हेतू तपासत आहे.
पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थ्याने गोळीबार सुरू करताच कॅम्पसच्या वर्गात पळून विद्यार्थ्यांची जाण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. गोळीबार टाळण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी स्वत:ला वर्गात कोंडून घेतले. येथे शिकणाऱ्या जेकब वेझमन या विद्यार्थ्याने सांगितले. शूटिंग सुरू असताना तो त्याच्या प्रोफेसरसोबत वर्गात होते.
पोलीस प्रमुख सांगतात की, आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, ज्या विद्यार्थ्याने गोळीबार केला तो स्वत:चा जीव घेण्याच्या उद्देशाने येथे आला होता. ते म्हणाले की गोळीबारानंतर काही वेळातच आम्हाला माहिती मिळाली की प्रागच्या पश्चिमेला सुमारे 13 मैल (21 किमी) स्थित होस्टोस शहरात एक मृत व्यक्ती सापडला आहे. विद्यापीठात गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे वडील असल्याचे मानले जात आहे. गेल्या आठवड्यात प्रागजवळील क्लानोविचमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाशी या शूटरचा संबंध आहे का, याचाही पोलिस या कोनातून तपास करत आहेत.





