प्रदीप कंद यांचा पाचर्णे यांना पाठिंबा: भाजप प्रवेश निश्चित

शिरूर: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रदिप विद्याधर कंद माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा भाजप मध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. कंद यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत पाचर्णे याना समर्थन देण्याचे जाहीर केले आहे.
सोमवारी शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रदिप विद्याधर कंद यांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने मुख्यमंत्री यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर कंद हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या चर्चेस दौंड चे आमदार राहुल कुल व भाजपचे पुणे शहर सरचिटणीस गणेश बिडकर उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेनंतर कंद यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज माघे घेत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.
यावेळी बोलताना कंद यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांशी झालेल्या संवादात सर्वांची मते जाणून घेतलीआहेत, त्यामुळे सर्वसमंतीने भाजपचे उमेदवार बाबुराव पाचार्णे यांना चांगल्या व भरघोस मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वानी निर्धार व्यक्त केला आहे. तसेच भविष्यात तालुक्यातील राजकीय अपप्रवृत्तींचा पुर्ण ताकतीने विरोध करुन सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी प्रयत्नशिल रहाणार असल्याचे कंद यांनी सांगितले.





