PBKS vs LSG : प्रभसिमरन सिंगने केला नवा पराक्रम! गेल-राहुलच्या विक्रमांची केली बरोबरी

Prabhsimran Singh missed century and create new record : आयपीएल २०२५ चा ५४ वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने २० षटकांत ५ गडी गमावून २३६ धावा केल्या. या सामन्यात पंजाबकडून प्रभसिमरनने शानदार फलंदाजी केली. त्याच्याकडे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावण्याची संधी होती, पण तो तसे करू शकला नाही. मात्र, त्याने एक नवीन विक्रम रचला आहे.
प्रभसिमरनने केला नवा विक्रम –
प्रभसिमरन शतक झळकवण्यात अपयशी ठरला, पण त्याने ४८ चेंडूत ९१ धावा करून नवा विक्रम केला रचला आहे. या हंगामात पंजाबसाठी सलामीवीर म्हणून प्रभसिमरन सिंगचे हे सलग तिसरे अर्धशतक आहे. तो पंजाबसाठी अशी कामगिरी करणार पहिला अनकॅप्ड खेळाडू आहे. याआधी ख्रिस गेल आणि केएल राहुल या दोन कॅप्ड खेळाडू सलामीला खेळताना ही कामगिरी केली आहे. २०१८ मध्ये क्रिस गेलने सलग ३ सामन्यात ३ अर्धशतके झळकावली. तर केएल राहुलने डावाची सुरुवात करताना तीन वेळा हा पराक्रम केला आहे. राहुलने २०१८, २०१९ आणि २०२० मध्ये पंजाबसाठी हा पराक्रम केला. या तीन हंगामात, राहुल सलग तीन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावण्यात यशस्वी झाला होता.
𝐏𝐫𝐚𝐛𝐡 𝐃𝐚 𝐁𝐚𝐧𝐝𝐚! ♥️
Three back-to-back fifties, and he’s not done yet. 💪 pic.twitter.com/ADbThG22rM
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 4, 2025
सलग सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावणारे पंजाब किंग्जचे सलामीवीर –
- ३. ख्रिस गेल (२०१८)
- ३. केएल राहुल (२०१८)
- ३. केएल राहुल (२०१९)
- ३. केएल राहुल (२०२०)
- ३* – प्रभसिमरन सिंग (२०२५)
हेही वाचा – RCB vs CSK : ‘वहां किसी को फील्डिंग करते देखा है…’, महागडा ठरलेल्या खलीलवर संतापला धोनी, पाहा VIDEO
आयपीएल २०२५ मध्ये प्रभसिमरनची कामगिरी राहिलीय उत्कृष्ट –
आयपीएल २०२५ मधील प्रभसिमरन सिंगच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांपैकी ११ डावांमध्ये प्रभसिमरनने ३९.७२ च्या सरासरीने ४३७ धावा केल्या आहेत. या हंगामात आतापर्यंत त्याने १७०.०३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. या हंगामात आतापर्यंत त्याच्या बॅटमधून ४ अर्धशतकी खेळी पाहायला मिळाल्या आहेत. लखनौविरुद्धच्या या सामन्यात त्याने ९१ धावा केल्या, ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.





