प्रभात प्रभाव ! अखेर शिरुर न्यायालयाने केली नियमित बंदुकधारी पोलिसाची मागणी

शिरूर – शिरूर न्यायालयाच्या आवारात शिविगाळ, हाणामारी, शिरूर न्यायालयाची सुरक्षा ऐरणीवर.. अशा आशयाच्या बातम्या दैनिक प्रभातमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या बातम्यांची दखल घेऊन शिरूर न्यायालयाने शिरूर पोलिस स्टेशनला सुरक्षेसाठी नियमित बंदुकधारी पोलिसाची मागणी केली आहे.
गेल्या काही महीन्यांपुर्वी शिरूर न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोळीबारामध्ये एक महिला ठार झाली होती. त्यानंतर आता न्यायालयाच्या आवारात दारू पिवून शिविगाळ, मित्र-मैत्रिणीमध्ये हाणामारी झाली होती. दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दारू पिवून शिविगाळ करणाऱ्याला समज देऊन सोडण्यात आले. मैत्रिणीने मारणाऱ्या मित्रावर तक्रार देण्यास नकार दिला होता..
परंतू सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ह्या घटना चुकीच्या असल्याने दैनिक प्रभातने याबाबत सडेतोड आवाज उठवला होता. बातम्यांची दखल घेत मा. न्यायालयाने बंदुकधारी पोलिसाची मागणी केली आहे. त्यामुळे आता शिरुर न्यायालयात बंदुकधारी पोलिस नियमितपणे हजर राहणार आहे. ‘दै. प्रभात’च्या धडाकेबाज वृत्तांकनाचे वकील असोसिएशन संघटनेने आभार मानले आहे.





