‘आदिपुरुष’ने बनवला मोठा विक्रम ! रिलीजपूर्वीच ओलांडला कमाईच्या 400 कोटींचा आकडा

मुंबई – दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आदिपुरुष या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार प्रभास भगवान रामाची तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे. पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टीजरनंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र रिलीजपूर्वी या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत नवा इतिहास रचला आहे.
आदिपुरुषची निर्मिती करताना निर्मात्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं होत.टीजरवरून वाद झाल्यानंतर चित्रपटाच्या सीनमध्ये काही बदल करण्यात आले. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडली यासह बजेटमध्ये देखील वाढ झाली. आदिपुरुषच्या निर्मितीसाठी तब्बल पाचशे कोटी रुपये बजेट लागल्याचे समजते. मात्र रिलीजपूर्वीच चित्रपटाने बजेटच्या 85 टक्के रकमेची कमाई केली आहे.
आदिपुरुषने 16 जून रोजी थिएटरमध्ये येण्यापूर्वीच 432 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे निर्मात्यांना मोठा दिलासा देखील मिळाला आहे. आदिपुरुषनेचे सॅटेलाईट राईट्स,म्युजिक राईट्स आणि ओटीटी राईट्स विकण्यात आले असून यामुळेच या चित्रपटाने रिलीजपूर्वी मोठी कमाई केली आहे.
याशिवाय चित्रपटाचे तेलुगू थिएट्रिकल राइट्स पीपल मीडिया फॅक्टरीने 185 कोटींना विकले आहेत. तर जीएसटी धरून ही रक्कम 247 कोटींच्या घरात गेली आहे. याशिवाय सॅटेलाइट, म्युझिक आणि डिजिटल हक्क मिळून चित्रपटाने ऐकून चारशे कोटींचा टप्पा पार केला आहे.





