पंचगंगा उद्योग समुहाचे संस्थापक प्रभाकर शिंदे यांचा अभिष्ठचिंतन सोहळा संपन्न

नेवासा : पंचगंगा उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर शिंदे (काका) यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यास शनिवार (दि.१९) रोजी खुपटी (ता.नेवासा) येथील शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी सकाळी दिवसभरापासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
पंचगंगा उद्योग समुहाने बियाणे क्षेत्रात राज्यासह देशात नाव झळकवलेले असून या उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष शिंदे यांचा त्यांच्या मुळगांवी खुपटी (ता.नेवासा) येथे दिवसभर सामाजिक,राजकिय,धार्मिक क्षेत्रासह विविध मान्यवरांनी खुपटी येथे हजेरी लावत शिंदे यांचे अभिष्ठचिंतन करुन शुभेच्छांचा मोठा वर्षाव केलेला होता.
स्वतंत्र नेवासा विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पंचगंगा उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर शिंदे (काका) इच्छुक असून जर जागा वाटपात भाजप – सेनेत फेरबदल झाल्यास शिंदे सेनेकडून शिंदे यांनाच उमेदवारी मिळणार असून अशा राजकीय हालचाली भाजप – सेनेच्या वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
पंचगंगा उद्योग समुहाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचा यंदाचा वाढदिवस मोठ्या धुमधडक्यात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला तालुक्यातील कानाकोपऱ्यातून राजकीय – सामाजिक आणि धार्मिक मंडळींसह अनेक रथी – महारथींनी शिंदे यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यास हजेरी लावल्यामुळे कार्यकर्त्यांमधून शिंदे यांच्या नावाला पसंती दिली जात असून लवकरच सेनेकडून त्यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे.
पंचगंगा उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यास विविध मान्यवरांची मांदियाळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरुच होती. यावेळी अनेक राजकीय नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी कांकावर शुभेच्छांचा वर्षाव केला.





