Prabhadevi News : प्रभादेवी सर्कल सुशोभीकरणाचा वाद चव्हाट्यावर! दोन्ही शिवसेनेतील कार्यकर्ते एकमेकांना भिडले; मुंबईत राडा, नेमकं प्रकरण काय?

Prabhadevi News : आगामी महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. अशातच आता दक्षिण मुंबईतील प्रभादेवी परिसरातील सुशोभीकरणाचा वाद चव्हाट्यावर आला असून ठाकरे आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची बातमी समोर आली आहे. आज सकाळी हा वाद झाला असून याप्रकरणी दादर पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
प्रभादेवी सर्कल येथील सुशोभीकरणाच्या कामावरुन दोन्ही गटात वाद झाला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पालिकेकडून येथील कामाच्या वर्क ऑर्डर मिळाल्या होत्या. यावरून आज सकाळी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आमने सामने आले आणि वाद उफालून आला. दोन वर्षांपूर्वी सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यानंतर आता या प्रकरणावरून पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. यामुळे आता या घटनेवरून राजकीय वातावरण तापलं आहे.
…अन् ते एकमेंकाना भिडले
त्यांच्याकडे प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणाची वर्क ऑर्डर होती. त्यामुळे शिंदे गटाने ठाकरे गटाची भूमिका लक्षात न घेता काम हाती कसं घेतलं असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला. यावरून हा वाद झाला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी येथील कामाला सुरुवात केली, त्यावेळी तिथे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आले आणि त्यांच्यात वाद सुरू झाला आणि काही क्षणातच ते एकमेकांना भिडले.
शिंदे गटाचं म्हणणं काय?
या वादाबाबत शिंदे गटाचे समाधान सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार प्रभादेवी सर्कलसाठी निधी उपलब्ध झाला होता. त्यानुसार टेंडर झालं, वर्क ऑर्डर निघाली, त्यासाठी काम सुरु करण्यात आलं होतं. त्यांच्याकडे वर्क ऑर्डर नाही. या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता, असं ते म्हणाले आहेत.
हेही वाचा : राहुल गांधी-योगींच्या मंत्र्यामध्ये खडाजंगी ; दिनेश प्रताप सिंह का संतापले? जाणून घ्या





