“एक तरफ सत्ता, दुसरी तरफ सच”; ‘रेड 2’मध्ये अजय आणि रितेशची जुगलबंदी

Ajay Devgn Raid 2 | बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण पुन्हा एकदा एका दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला त्याचा ‘रेड 2’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत रितेश देशमुख पाहायला मिळणार आहे.
‘रेड 2’च्या ट्रेलरला हटके कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “एक तरफ सत्ता, दुसरी तरफ सच – ये RAID अब और बडी हो चुकी है…” या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. रेडच्या पहिल्या भागात लखनऊ शहरातील ताऊजींच्या घरी अमेय पटनायक यशस्वी छापा मारुन त्यांना जेरबंद करतो.
View this post on Instagram
‘रेड २’मध्ये हेच ताऊजी आता जेलमधून अमेय पटनायकच्या सर्व हालचालींची माहिती घेत असतात. अमेय पटनायक आता ७५ वी रेड मारण्यास सज्ज असतो. दादाभाईच्या घरी अमेय पटनायक त्याच्या साथीदारांसह रेड मारायला येतो. आता ही रेड किती यशस्वी होणार हे पाहणे सर्वांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे. Ajay Devgn Raid 2 |
‘रेड 2’ चित्रपटात रितेश देशमुख दादाभाईच्या भूमिकेत आहे. अजय आणि रितेश सोबतच या चित्रपटात वाणी कपूर, सौरभ शुक्ला हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. 2018 मध्ये ‘रेड’ चित्रपट सुपरहिट ठरला होता, त्यानंतर आता रेड 2 चित्रपट 1 मे 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ‘रेड 2’ चित्रपटाचे दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केले आहे. Ajay Devgn Raid 2 |
हेही वाचा:
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी आपले म्हणणे मांडा; खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस





