Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुखांच्या पोस्टमार्टम अहवालातून ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

बीड : बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र्रात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी सातत्यानं पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दरम्यान आता संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम अहवाल समोर आला आहे. यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar : गिरीश आता तरी सुधार…; अजित पवारांचा विधानसभेत गिरीश महाजनांना टोला
पोस्टमार्टम अहवालात नेमकं काय म्हटलं?
संतोष देशमुखांच्या छातीवर डोकं, हात-पाय चेहऱ्यावर जबर मारहाण करण्यात आली आहे. त्यांच्या चेहरा आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळे काळा -निळा पडला होता. संतोष देशमुखांचा मृत्यू ‘हॅमरेज टू मल्टिपल इन्जुरिज’मुळे झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडून देण्यात आली आहे.संतोष देशमुखांना जबर मारहाण केल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. जबर मारहाण केल्यामुळे संतोष देशमुख यांच्या शरीरातून अति रक्तस्त्राव झाला, त्यामुळे संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे.
पोस्टमार्टम अहवालानुसार संतोष देशमुख यांच्या अंगावर एकूण 56 जखमा आहेत. डोळ्यांना मारहाण करण्यात आली, मात्र जाळण्याचा प्रयत्न झाला नसल्याचं समोर आलं आहे. पाठीवर सर्वाधिक मुका मार देण्यात आला आहे. त्यांना लोखंडाच्या पाईपनं मारहाण करण्यात आली आहे. मात्र अंगावर कुठेही फॅक्चर नाहीये, संतोष देशमुख यांना किमान दीड तास मारहाण करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. ते ज्या गाडीनं प्रवास करत होते, त्या गाडीला थांबवून सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले. यानंतर त्यांना जबर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.





