स्वप्निलच्या ‘बळी-दि विक्टम’ चित्रपटाचं पोस्टर आउट
Updated On:

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्ह्णून ओळखला जाणार अभिनेता ‘स्वप्नील जोशी’ आपल्या चाहत्यांसाठी एक नवीन प्रयोग घेऊन येत आहे. स्वप्नीलची मुख्य भूमिका असलेल्या ‘बळी’ चित्रपटाचं नुकतंच ऑफिशल पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक क्रॉस दिसत असून काहीतरी गंभीर घडते आहे, असे त्यातून प्रतीत होते.
हे पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटाची नक्की कथा काय असेल आणि यामध्ये नेमका स्वप्नील जोशी कोणत्या वेगळ्या लूक आणि भूमिकेमध्ये दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात ताणली गेली आहे. ‘बळी-दि विक्टम’ हा चित्रपट येत्या २०२० साली प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी केली आहे. तर दिग्दर्शन ‘लपाछपी’ फेम विशाल फुरिया करत आहेत.





