अक्षय कुमारच्या आगामी ‘राम सेतू’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

मुंबई – मिशन मंगल, हाऊसफुल, रुस्तम, पॅड मॅन, टॉयलेट एक प्रेम कथा आणि लक्ष्मी अश्या सुपरहिट आणि दर्जेदार चित्रपटांमधून सिनेरसिकांचे मनोरंजन करणारा बॉलिवूड अभिनेता ‘अक्षय कुमार’ पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे.
https://www.facebook.com/akshaykumarofficial/posts/10158360465298283
आज (दि. १४) दिवाळीच्या मुहूर्तावर अक्षयने आपल्या आगामी “राम सेतू” या चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर प्रदर्शित केले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या पोस्टरवर अक्षयचा कधीही न पाहिलेला अंदाज दिसून येत आहे. तसेच अक्षयने आपल्या फॅन्सला दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. राम सेतू चित्रपटाची निर्मिती अरुणा भाटिया आणि विक्रम मल्होत्रा यांनी केली असून, दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं आहे.
https://www.facebook.com/akshaykumarofficial/posts/10158360459138283
आपल्या हरहुन्नरी अभिनयाने अक्षयने चाहत्यांच्या मनात घर निर्माण केले आहे. सध्या अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा आणि यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो.





