नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर २४ मे रोजी पीएम नरेंद्र मोदी चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. नागपूरमध्ये आज चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. यावेळी अभिनेता विवेक बोबेरॉय आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते. गडकरींच्या हस्ते चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका विवेक ओबरॉय निभावत असून ओमंग कुमार यांची चित्रपट दिग्दर्शन केले आहे.