Post Office Scheme: निवृत्तीनंतर पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरू शकते फायदेशीर; जाणून घ्या अधिक माहिती

Post Office Scheme: प्रत्येक नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पैशांची गुंतवणूक करतो. परंतु निवृत्तीनंतर भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे यासाठी अनेकजण गुंतवणूकीसाठी कोणता मार्ग योग्य असेल याचा शोध घेतात. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन स्कीम राबवण्यात आली आहे. या योजनेत तुम्ही निवृत्तीनंतरचे पैसे गुंतवू शकतात.
पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन स्कीम ज्येष्ठ नागरिकांना बँक एफडीवर केवळ 6.50 टक्के परतावा देत आहेत, परंतु ज्येष्ठ नागरिक बचत योजना वार्षिक आधारावर 8.2 टक्के परतावा देत आहे. निवृत्तीनंतर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी अधिक चांगली ठरू शकते. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असावे. पोस्ट ऑफिस सिनियर सिटीझन स्किममध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला वर्षाला सुमारे 2,46,000 रुपये व्याज मिळेल.
कोणाला करता येणार गुंतवणूक ?
जर कोणी स्वेच्छानिवृत्ती योजना (VRS) 50 वर्षांपेक्षा जास्त वयाची घेतली असेल तर तो या योजनेत गुंतवणूक करू शकतो. याशिवाय संरक्षण क्षेत्रातून निवृत्त झालेले लोकही या पोस्ट ऑफिस योजनेत पैसे गुंतवणूक करू शकतात. या योजनेत 1,000 ते 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. जर तुम्हाला 1 लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही रोखीने खाते उघडू शकता. तुम्ही 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास तुम्हाला चेक जमा करावा लागेल.
1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सूट
या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करून, ग्राहकांना आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सूट दिली जाते. या योजनेत तीन महिन्यांनी व्याजाचे पैसे मिळतात. प्रत्येक एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीच्या पहिल्या दिवशी तुमच्या खात्यात व्याज जमा केले जाते. हे खाते भारतात कुठेही हस्तांतरित केले जाऊ शकते.





