Cristiano Ronaldo | सर्वोत्तम खेळाडूचा रोनाल्डोला पुरस्कार

लंडन -पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. मॅंचेस्टर युनायटेड संघाने रोनाल्डोची निवड या पुरस्कारासाठी केली.
रोनाल्डो गेल्या ऑगस्ट महिन्यात मॅंचेस्टर क्लबकडे पुन्हा परतला होता. त्याने आपली गुणवत्ता सिद्ध करताना न्यूकॅसल युनायटेडविरुद्धच्या सामन्यात मॅंचेस्टर युनायटेडला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. हा सामना मॅंटेस्टरने 4-1 असा जिंकला होता.
या सामन्यात गोल करत रोनाल्डोने युरोपियन लीगमध्ये नव्या मोसमाचा थाटात प्रारंभ केला होता. तसेच अन्य लढतीत यंग बॉईज विरुद्ध त्याने गोल केला. तर, त्यानंतर विलारियल विरुद्धच्या सामन्यातही गोल करत संघाला विजय मिळवून दिला होता.
रोनाल्डोने नुकताच आपला क्लब कारकिर्दीतील 178 वा सामना साजरा केला होता व अशी कामगिरी करणारा लीग फुटबॉलमधील तो पहिलाच खेळाडू ठरला होता.





