‘पोर्ट ब्लेअर’चे नाव बदलले; गृहमंत्री अमित शाहांची घोषणा, जाणून घ्या नवीन नाव काय ठेवले?

नवी दिल्ली – आता पोर्ट ब्लेअरचे नावही बदलले आहे, ते बदलून ‘श्री विजयपुरम’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत त्यांच्या एक्स हॅंडलवर घोषणा केली आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर लिहिले की, देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतिकातून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान श्री
नरेंद्र मोदी जी यांच्या ठरावाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव ‘श्री विजयपुरम’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि इतिहासात या बेटाचे अनन्यसाधारण स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज झाले आहे.
हे बेट ते ठिकाण आहे जिथे नेताजी सुभाषचंद्र बोस जी यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता आणि वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी सेल्युलर जेलमध्ये भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता.
देश को गुलामी के सभी प्रतीकों से मुक्ति दिलाने के प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के संकल्प से प्रेरित होकर आज गृह मंत्रालय ने पोर्ट ब्लेयर का नाम ‘श्री विजयपुरम’ करने का निर्णय लिया है।
‘श्री विजयपुरम’ नाम हमारे स्वाधीनता के संघर्ष और इसमें अंडमान और निकोबार के योगदान को…
— Amit Shah (@AmitShah) September 13, 2024


