श्री श्री रविशंकर यांच्या भूमिकेत दिसणार बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता

Sri Sri Ravi Shankar | जागतिक आध्यात्मिक गुरु आणि आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची भूमिका बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता साकारणार आहे. ‘व्हाईट’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ’12 वी फेल’ या चित्रपटातून कौतुकाची थाप मिळवलेला अभिनेता विक्रांत मेस्सी आता श्री श्री रविशंकर यांची भूमिका साकारणार आहे.
विक्रांतने नुकतेच श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ‘व्हाईट’ सिनेमात कोलंबियामध्ये ५२ वर्षांपासून सुरु असलेलं नागरी युद्ध कसं मिटलं, याची कहाणी पाहायला मिळणार आहे. कोलंबियामधील संघर्षमय वातावरणात भारतीय अध्यात्मिक तत्वज्ञानाने कशी मोलाची भूमिका पार पडली, याची कहाणी दिसणार आहे. Sri Sri Ravi Shankar |
View this post on Instagram
;
चित्रपटाची कथा प्रसिद्ध जाहिरात दिग्दर्शक आणि लेखक मोंटो बसी यांनी लिहिली असून, त्यांनी या चित्रपटासाठी चार वर्षे संशोधन करण्यात आले आहे. ‘व्हाइट’ हा चित्रपट प्रसिद्ध जाहिरात दिग्दर्शक मोंटू बासी यांनी दिग्दर्शित केला आहे. र सिद्धार्थ आनंद आणि महावीर जैन यांच्यासह पीसक्राफ्ट पिक्चर्सने या चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे. हा चित्रपट इंग्रजी आणि स्पॅनिश भाषांमध्ये तयार केला जाईल आणि विविध भारतीय भाषांमध्ये डब केला जाईल.
विक्रांत मेस्सीने या भूमिकेसाठी केस वाढवले असून, तो स्वतःच्या शारीरिक बदलांवर आणि हावभावांवरही काम करत असल्याचे दिसत आहे. ’12th Fail’ आणि ‘द साबरमती रिपोर्ट’ मधील त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता ‘व्हाईट’ सिनेमामध्ये विक्रांत श्री श्री रविशंकर यांची भूमिका साकारणार आहे. Sri Sri Ravi Shankar |
हेही वाचा:





