करण जोहरच्या ‘नागझिला’ चित्रपटात दिसणार बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता

NaagZilla Film | करण जोहरने त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ‘नागझिला’ असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाच्या माध्यमातून करण पहिल्यांदाच प्रेक्षकांना सापांच्या अनोख्या दुनियेची सफर घडवणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता दिसणार आहे.
‘नागझिला’ सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालं असून बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन या सिनेमात झळकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘नागझिला’ सिनेमात कार्तिक दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. या पोस्टरमध्ये कार्तिकने निळी जीन्स घातलेली असून तो शर्टलेस पाठमोरा उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला फक्त सापच साप आहेत आणि त्यांच्या अंगावरही साप गुंडाळलेले दिसत आहेत.
View this post on Instagram
;
याशिवाय या व्हिडिओ पोस्टरमध्ये कार्तिक आर्यनचा व्हॉइस ओव्हर ऐकू येतो. ज्यात तो म्हणतो, “इच्छाधारी नाग, रूप बदलण्याची शक्ती असलेले साप, जसे की मी प्रियमवदेश्वर प्यारे चंद, वय 631 वर्षे. माणसांच्या पिक्चर तर खूप पाहिल्या, आता पाहा नागांच्या पिक्चर.” यात करणने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. कार्तिक आर्यनचा ‘नागजिला’ हा चित्रपट नागपंचमीच्या मुहूर्तावर 14 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. NaagZilla Film |
‘नागझिला’ या चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबर 2025 मध्ये सुरू होणार आहे. हा चित्रपट साप आणि माणसाच्या संघर्षावर आधारित विनोदी कथा आहे, ज्यात कार्तिक आर्यन दोन परस्परविरोधी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृगदीप सिंग लांबा करत असून या सिनेमाची निर्मिती करण जोहर आणि महावीर जैन यांनी केली आहे. NaagZilla Film |
हेही वाचा:
हास्यजत्रेतील कलाकार ‘प्रेमाचा गुलकंद’ गाण्यावर थिरकले; न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरजवळ दाखवला जलवा





