Pope Leo XIV : अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी इराण युद्धाबाबत वाद घालण्यात आपल्याला काहीही स्वारस्य नाही, असे ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप लिओ १४ वे (Pope Leo XIV) यांनी म्हटले आहे. मात्र गॉस्पेलमधील शांततेचा संदेश लोकांपर्यंत पोचवण्याचे काम आपण यापुढेही करतच राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कॅमेरूनवरून अंगोलाला जात असताना विमानात पोप यांनी पत्रकांरांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. पोप (Pope Leo XIV) यांनी शांततेसाठी केलेल्या आवाहनावर ट्रम्प यांनी वारंवार टीका आणि उपरोधिक शेरेबाजी केली होती. गेल्या आठवड्यात त्यांच्या या टिप्पणीमुळे माध्यमांमध्ये पोप विरुद्ध ट्रम्प असा वाद रंगला होता. त्यावर पोप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शांततेसाठीचा संदेश म्हणजे ट्रम्प यांना काही सूचना करणे नव्हे. तर या संदेशातून गॉस्पेलमधील व्यापक शांततेचा संदेश प्रस्तृत करण्याचा आपला हेतू होता, असे ते म्हणाले. Pope Leo XIV ट्रम्प यांनी जे काही भाष्य केले, ते सर्वथा योग्य नव्हते. ते केवळ राजकीय परिस्थितीवरचे भाष्य होते. त्यानंतर माजझ्या भाष्यावर त्यांचे भाष्य असे सत्रच सुरू राहिले होते. कोणाला नक्की काय म्हणायचे होते, याचा अन्वयार्थ काढण्यासाठी ही टिप्पणी सुरू होती, असेही पोप म्हणाले. पोप (Pope Leo XIV) यांनी वारंवार शांततेचे आवाहन केले होते आणि युद्धाचा धार्मिक समर्थन देण्याच्या प्रयत्नांवर टीका केली होती. विशेषतः इराणी संस्कृतीच नष्ट करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली होती, ती अगदी अमान्य असल्याचे पोप म्हणाले होते. तर ट्रम्प यांनी पोप यांच्यावर गुन्ह्यांबाबत सौम्य असल्याचा, डाव्यांना झुकते असल्याचा आरोप केला होता. विशेषतः अमेरिकेतील पहिले पोप या नात्याने पोप यांनी अमेरिकेची बाजू घ्यायला हवी होती, असेही ट्रम्प म्हणाले होते. जेंव्हा शांततेच्या संदेशाविषयी बोलले जाते, तेंव्हा केवळ इराण युद्ध हाच विषय नसतो. संघर्षाची व्याप्ती आता मोठ्या भूभागात पसरला आहे. जुलूमशाही, शोषणाबाबतही आपण हेच बोलत होतो. असेही पोप म्हणाले. कॅमेरूनचा दौरा संपवून पोप अंगोला येथे दाखल झाले आहेत. येथेही आपण शांततेच्या संदेशाविषयीच बोलणार आहोत, असेही पोप म्हणाले.