Crime News : टेम्पोमधून पॅापकॅार्नचा माल लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर : शिरूर शहरातील बाबुरावनगर भागात उभ्या असलेल्या टेम्पोमधून अज्ञात चोरट्याने तब्बल 53 हजार 532 रुपयांचा पॉपकॉर्नचा साठा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी फिर्यादी दत्तात्रय भाउसाहेब देवकर (वय३१ वर्ष ) व्यवसाय – चालक, रा. चांडोली गाव, ता. खेड, जि. पुणे यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, ही चोरी ६ ऑगस्ट रोजी रात्री १०:३० ते ७ ऑगस्ट सकाळी ५:१० या वेळेत घडल्याचे निदर्शनात आले आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक लेलँड टेम्पो एम एच१४जे पी ६७८६ हा टेम्पो शिरूर शहरातील कोळपे हॉस्पिटलजवळ, बाबुरावनगर येथे लावलेला होता. त्या टेम्पोमधून अज्ञात चोराने १५ सिलबंद गोण्या प्रत्येकी ३० किलो वजन आणि १४किलो वजनाचा बॉक्स असा एकूण ४६४किलो वजनाचा पॉपकॉर्न माल चोरून नेला आहे.
या पॉपकॉर्न मालाची एकूण किंमत ५३ हजार ५३२ रुपये असून, प्रत्येक गोणीवर स्वतंत्र किंमत नमूद केले होती. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शकाखाली पुढील तपास पोलीस हवालदार भगत हे करत आहेत.





