अभिनेत्री पूनम पांडे ‘रामलीला’मधून बाहेर; विरोधानंतर समितीचा निर्णय

Poonam Pandey | अभिनेत्री पूनम पांडे हिच्या दिल्लीतील लवकुश रामलीला आयोजित कार्यक्रमातील भूमिकेवरुन वाद निर्माण झाला आहे. यात ती रावणाच्या पत्नीची म्हणजेच मंदोदरीची भूमिका साकारणार होती. मात्र पुनम पांडेच्या ‘रामलीला’मधील प्रवेशामुळे हिंदू संघटनेने तीव्र विरोध केला. याची दखल घेत दिल्लीत होणाऱ्या भव्य लव कुश रामलीलेत मंदोदरीची भूमिका साकारणार असलेल्या पूनम पांडेला या भूमिकेतून काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. आता ती मंदोदरीची भूमिका साकारणार नाही.
रामलीला समितीने 23 सप्टेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेतपूनम पांडे मंदोदरीची भूमिका करणार नसल्याचे जाहीर केले. समितीने जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, ‘लव कुश रामलीला समितीच्या वतीने पूनम पांडेने दोदरीची भूमिका साकारण्यास समती दिली. त्यांच्या उत्साहाचा आणि सहकार्याचा आम्ही आदर करतो. मात्र तुमच्या निवडीनंतर समाजाच्या विविध घटकांकडून वेगवेगळे प्रतिसाद मिळाले.’
‘विचारविनिमयानंतर समितीने निर्णय घेतला आहे की, यावर्षी मंदोदरीची भूमिका दुसऱ्या कलाकार साकारेल. हा निर्णय केवळ सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. समितीचा तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रेम तोच आहे आणि तो कमी झालेला नाही. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढील यशासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो’. त्यामुळे आता यात पूनम पांडेऐवजी दुसरी अभिनेत्री पाहायला मिळेल. Poonam Pandey |
पूनम पांडेने मानले होते आभार
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पूनम पांडेने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिला ‘रामलीला’मध्ये सहभाग घेण्याची संधी दिल्यामुळे ती खुश असल्याचे सांगत होती. मात्र आता तिची ‘रामलीला’मधून एक्झिट झाली आहे. पूनम पांडेने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत रामलीलामध्ये काम कारायला मिळाल्यामुळे धन्यवाद मानले होते. Poonam Pandey |
ती म्हणाली होती की, “दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जगात प्रसिद्ध असलेला लव कुश रामलीलाचा प्ले सादर होतो. त्या मला रावणाची पत्नी मंदोदरी हे महत्वाचे पात्र साकारण्याची संधी मिळाली आहे. मी खूप खुश आहे. त्यामुळे मी ठरवले आहे की, मी पूर्ण नवरात्रीत उपवास ठेवेन. म्हणजे मनापासून हे पात्र साकरण्यास मला मदत होईल. जय श्री राम!” Poonam Pandey |
हेही वाचा:





