Manorama Khedkar| वादग्रस्त प्रशिणार्थी आयएएस डॉ. पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटंबातील व्यक्तींबाबत नवनवे खुलासे होत आहेत. काही दिवसांपूर्वी पूजा खेडकर यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांशी देखील हुज्जत घालत असल्याचा देखील त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
यानंतर पोलिस त्यांचा तपास करत होते, अखेर मनोरमा खेडकर यांना रायगडमधून ताब्यात घेतले आहे. पूजा खेडकरच्या बाणेर येथील बंगल्यावर जाऊन पोलिसांनी मनोरमा खेडकर असल्याची पाहणी केली होती. त्यावेळी घराच्या गेटवरती कुलूप लावल्याचे निर्दशनास आले. त्यांचा फोन देखील बंद असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांची ३ पथकं मनोरमा खेडकरसह इतरांचा शोध घेत होते. Manorama Khedkar|
आज अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकरला अटक करण्यात आले. मनोरमा खेडकर महाड तालुक्यातील हिरकणवाडीमधील पार्वती हॉटेलमध्ये लपून बसल्या होत्या. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पोलिसांचं पथक हॉटेलवरती दाखल झालं त्यानंतर मनोरमा खेडकरला अटक करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक मनोरमा खेडकर यांना घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण ? Manorama Khedkar|
पिस्तूलाचा धाक दाखवून मुळशीतील शेतकऱ्यांना दमदाटी केल्याची चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर आयएएस पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर (दोघे रा. नॅशनल हाऊसिंग सोसायटी, बाणेर), अंबादास खेडकर (रा. आंबी, ता. हवेली) यांच्यासह सातजणांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खेडकर यांच्यासोबतच्या अंगरक्षकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींमध्ये महिला अंगरक्षकांचा समावेश आहे. याबाबत शेतकरी पंढरीनाथ कोंडिबा पासलकर (६५, रा. केडगाव, आंबेगाव पुनर्वसन, ता. दौंड, जि. पुणे) यांनी याबाबत पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पिस्तूल दाखवत शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा:
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन कोविड-19 पॉझिटिव्ह