दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमानच्या चित्रपटात होणार पूजा हेगडेची एन्ट्री; चाहते उत्सुक

Dulquer Salmaan And Pooja Hegde | दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेता दुलकर सलमान ‘डीक्यू४१’ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. यात तो नव्या लूकमध्ये दिसणार आहे. अशातच या चित्रपटासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. दुलकर सलमानच्या बहुप्रतिक्षित ‘DQ41’ चित्रपटात पूजा हेगडेची एन्ट्री झाली आहे. सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे पूजाच्या एन्ट्रीची माहिती देण्यात आली आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पूजा अतिशय साध्या अंदाजात दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत निर्मात्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, ‘आमच्या चित्रपटामध्ये पूजा हेगडे हिचं मनःपूर्वक स्वागत. दुलकर आणि पूजाची जोडी मोठ्या पडद्यावर एक वेगळं जादू निर्माण करेल.’
View this post on Instagram
तब्बल तीन वर्षांनंतर पूजा टॉलीवूडमध्ये पुनरागमन करत असल्याने तिचे चाहते आनंदी आहेत. दुलकर सलमान आणि पूजा हेगडे यांना पहिल्यांदाच एकत्र पाहण्याची संधी मिळणार असल्याने, या सिनेमाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
हा चित्रपट दिग्दर्शक रवी नेलाकुडिटी यांच्या दिग्दर्शनाखाली बनत आहे आणि SLV सिनेमाजद्वारे निर्मित होत आहे. पूजाच्या हाती अनेक मोठे प्रोजेक्ट्स असून, ती वरुण धवनसोबत ‘है जवानी तो इश्क होना है’, तसेच ‘जना नायकन’ आणि ‘सूर्या ४४’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
हेही वाचा:





