पूजा भट्टने केला खुलासा म्हणाली,’तुटलेल्या लग्नामुळे आधार म्हणून मी दारू स्वीकारली अन्…’

pooja bhatt – ९० च्या दशकातील अभिनेत्री आणि दिग्दर्शिका पूजा भट्टने नुकतेच पडद्यावर पुनरागमन केले. बिग बॉस ओटीटी 2 या रिअॅलिटी शोमध्ये ती दिसली होती. अशात पूजाने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली होती. त्याचवेळी पूजाने पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने खुलासा केला आहे.
एक कार्यक्रमादरम्यान पूजाने तुटलेल्या लग्नापासून ते व्यसनांबाबत आणि इतर सर्व गोष्टींबद्दल मोकळेपणाने संवाद साधला. यादरम्यान पूजा म्हणाली, “मी एका लग्नात होते, जे तुटत चालले होते. मात्र, ते कोणत्याही कारणास्तव नव्हते, तर त्यात कंटाळा आला होता. आमच्या दोघांनीही एकमेकांची फसवणूक केली नव्हती, पण आमचा एकमेकांमधील रसही कमी झाला होता.
एक स्त्री म्हणून समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीत राहून मी स्वतःला हरवून बसले आहे असे मला वाटले. काही काळानंतर, मला समजले की मी एका लग्नात अडकले आहे जे काम करत नव्हते. या लग्नात माझं अस्तित्वच हरवलं होतं. मी कोण आहे हे विसरले होते,’तो खूप छान माणूस असला तरी मला त्याच्या सोबतच्या नात्यात एकटे वाटत असे.
यादरम्यान पूजाने तिची व्यसनातून कशी सुटका झाली हे देखील सांगितले. ती म्हणाली,’माझ लग्न तुटल्यानंतर मी व्यसन करायला लागले मात्र नंतर मला कळेल कि व्यसनात आपण अडकलोय मी माझं दुःख कमी करण्यासाठी व्यसन करत होते. मात्र काही काळानंतर मी माझ्या एकाकीपणा आणि वेदनांशी लढायला शिकले आणि दारू सोडली.





