सातव्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 40.09% मतदान ; हिमाचल-बंगालमध्ये सर्वाधिक, पंजाब-ओडिशामध्ये संथगतीने मतदान

polling till 1 pm । लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शनिवारी सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे. ज्या जागांवर आज मतदान होत आहे त्यामध्ये पंजाब आणि यूपीमधील प्रत्येकी 13 जागा, पश्चिम बंगालमधील 9 जागा, बिहारमधील 8 जागा, ओडिशातील 6 जागा, हिमाचल प्रदेशातील 4 जागा, झारखंडमधील 3 जागा आणि चंदीगडमधील एका जागेचा समावेश आहे .
या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. या टप्प्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हमीरपूरमधून, ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बरमधून, लालू प्रसाद यांची कन्या मीसा भारती पाटलीपुत्रमधून आणि अभिनेत्री कंगना रणौत मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
पंजाब-ओडिशामध्ये संथगतीने मतदान polling till 1 pm ।
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील आजच्या मतदानात सर्वात जास्त मतदान हिमाचल प्रदेशमध्ये नोंदवण्यात आले आहे. तर दुसरीकडे पंजाब-ओडिशामध्ये संथगतीने मतदान पार पडत आहे.
दुपारी 1 वाजेपर्यंत 40.09% मतदान polling till 1 pm ।
दरम्यान, लोकसभा निवडणूक 2024 च्या शेवटच्या टप्प्यात 57 जागांवर मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, दुपारी 1 वाजेपर्यंत 40.09% मतदान झाले आहे. बिहारमध्ये 35.65%, हिमाचल प्रदेशात 48.63%, झारखंडमध्ये 46.80%, ओडिशामध्ये 37.64%, पंजाबमध्ये 37.80%, उत्तर प्रदेशमध्ये 39.31%, पश्चिम बंगालमध्ये 45.07%, चंदीगडमध्ये 40.14% मतदान झाले.





