Tarun Chugh : काॅंग्रेसमुळेच लोकशाही धोक्यात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांचा आरोप
भाजपचे सरचिटणीस (संघटना) तरुण चुघ (Tarun Chugh) यांनी काँग्रेस पक्ष आणिलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

Tarun Chugh : भाजपचे सरचिटणीस (संघटना) तरुण चुघ (Tarun Chugh) यांनी काँग्रेस पक्ष आणिलोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेस पक्ष जमावाच्या बळावर चालणा-या अराजकतेच्या माध्यमातून लोकशाही आणि न्यायव्यवस्थेला धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पंजाबमधून येणारे आणि राज्यसभेचे खासदार असलेले चुघ (Tarun Chugh) यांनी आरोप केला की, काँग्रेसचा इतिहास म्हणजे आणीबाणीचा इतिहास आहे; देशावर आणीबाणी लादण्याचा इतिहास आहे. १९८४ च्या दंगलींमधील भीषणतेचा उल्लेख करत चुघ यांनी दावा केला की, त्या वर्षी देशातील ५३ शहरे स्मशानभूमी बनली होती, जिथे शीख समुदायातील लोकांना जिवंत जाळले गेले होते.
१९९० मध्ये अयोध्येत कारसेवकांचे मृतदेह पाहायला मिळाले होते. तसेच, देशाला भोपाळ गॅस दुर्घटना किंवा बोफोर्स घोटाळाही विसरता येणार नाही. लोकशाही मार्गाने निषेध करण्याच्या नावाखाली काँग्रेस देशातील तरुणांना राजकीय संघर्षात प्यादे बनवत आहेत.
चुघ पुढे म्हणाले, देश लोकशाहीने चालतो, हुकूमशाहीने नाही. बांगलादेशच्या धर्तीवर सत्तापालटाची भाषा करणे म्हणजे निषेध नव्हे, तर राष्ट्राविरुद्ध रचलेले एक कारस्थान आहे. तथाकथित अराजकतावाद्यांचे खरे रूप आता समोर आले आहे.
जनतेकडून वारंवार नाकारले गेल्यामुळे, सत्तेसाठी भुकेलेले हे काँग्रेस नेते आता निष्पाप तरुणांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहेत, जेणेकरून अराजकता पसरवता येईल आणि सत्तापालटाचे नीच कारस्थान (Tarun Chugh) रचता येईल. पण काँग्रेस आणि त्यांच्या विरोधी मित्रपक्षांना जनता चोख प्रत्युत्तर देईल.






