Sadabhau Khot : सत्तेच्या सारीपाटावर स्वयंघोषित पुरोगामी धृतराष्ट्र बनला..! आमदार सदाभाऊ खोत यांची रोहित पवारांवर बोचऱ्या शब्दांत टीका
Sadabhau Khot : आमदार सदाभाऊ खोत यांनी एक्सवरुन ट्वीट करत आमदार रोहित पवार यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.

Sadabhau Khot : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक घोषित झाली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 26 एप्रिलला मतदान होणार असून, 6 मे या दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीची पोटनिवडणूक लढवत असून, त्यांना पवार कुटुंबाकडून पाठिंबा मिळाला आहे. आमदार रोहित पवार स्वतः काकी सुनेत्रा पवार यांच्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. यावर आमदार सदाभाऊ खोत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार रोहित पवारांवर टीका केली आहे. Sadabhau Khot

Sadabhau Khot : सत्तेच्या सारीपाटावर स्वयंघोषित पुरोगामी धृतराष्ट्र बनला..! आमदार सदाभाऊ खोत यांची रोहित पवारांवर बोचऱ्या शब्दांत टीका
रोहित पवारांच्या या भूमिकेवर सदाभाऊ खोत यांनी ‘एक्स’या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्वीट केले आहे. खेळ मांडला खेळ मांडला..! पुरोगामीपणाचा खेळ मांडला..!! सत्तेच्या सारीपाटावर स्वयंघोषित पुरोगामी धृतराष्ट्र बनला..! पुरोगाम्यांनो, आम्ही पुरोगामीपणाचा खेळ मांडीला! सत्तेच्या जोरावरती, कधी भावनेच्या लाटेवरती, कधी जातीवादाच्या नावावरती पुरोगामीपणाचा खेळ मांडला, अशा शब्दांत खोतांनी रोहित पवारांवर शब्दिक हल्ला चढवला आहे. यानंतर यावर आता रोहित पवार प्रतिक्रिया देणार का याकडे लक्ष असणार आहे. Sadabhau Khot
खेळ मांडला खेळ मांडला..!
पुरोगामीपणाचा खेळ मांडला..!!
सत्तेच्या सारीपाटावर स्वयंघोषित पुरोगामी धृतराष्ट्र बनला..!
पुरोगाम्योनो, आम्ही पुरोगामीपणाचा खेळ मांडीला…!!सत्तेच्या जोरावरती
कधी भावनेच्या लाटेवरती
कधी जातीवादाच्या नावावरती पुरोगामीपणाचा खेळ मांडला…! pic.twitter.com/ljhwVpieSm— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) April 16, 2026
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीतून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. Sadabhau Khot
मी दुसऱ्या पक्षात असलो तरी दादांचा मी फॅन होतो, ते माझे काका होते. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पवार साहेबांपासून अनेकांनी प्रयत्न केले. मोठ्या पक्षांनी उमेदवार दिला नाही. पण अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी उभा राहायला नको होतं, असे मत रोहित पवारांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा : BMC News : थेट नगरसेविकेच्या पर्समधून रोकड लंपास; पालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह





