Jairam Ramesh : राजकीय पक्षांच्या माध्यमातून 10 हजार कोटींची करचोरी; जयराम रमेश यांचा आरोप
देशातील मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून तब्बल १० हजार कोटी रुपयांची करचोरी करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी केला आहे.

Jairam Ramesh : देशातील मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून तब्बल १० हजार कोटी रुपयांची करचोरी करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी केला आहे. तसेच या करचोरीची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात मागणी त्यांनी केली. दरम्यायन, या आरोपांवर केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, देशातील ३,२६० बनावट राजकीय पक्षांमागील चाणक्य कोण आहे आणि या कथित घोटाळ्याचा खरा सूत्रधार कोण आहे. याचे उत्तर मोदी सरकारने देशाला दिलेच पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशातील काळा पैसा परत आणण्यात अपयशी ठरले असून नागरिकांना प्रत्येकी १५ लाख रुपये मिळण्याचे आश्वासनही अद्याप पूर्ण झालेले नाही.
आता असे दिसून येत आहे की भाजपच्या संरक्षणाखाली देशातच काळा पैसा पांढरा करण्याची योजना राबवली जात आहे, असे ते म्हणाले. बनावट राजकीय पक्षांच्या माध्यमातून प्राप्तिकर चोरी आणि मनी लाँड्रिंगची प्रकरणे उघडकीस येऊनही सरकारने कथित करचोर आणि अशा पक्षांविरुद्ध कारवाई का केली नाही, असा सवाल रमेश (Jairam Ramesh) यांनी केला.






